Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या भव्य राम मंदिराच्या इमारतीतील फक्त तळमजला तयार झाला आहे. परंतु, गाभारा पूर्ण झाला असल्याने आज २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भव्य राम मंदिर हे पारंपारिक भारतीय वारसा वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असल्याचं म्हटलं जातंय. राम मंदिर शतकानुशकते टीकून राहिल अशापद्धतीने बांधकामात आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे राम मंदिराच्या उभारणीत स्टील आणि लोखंडाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष, नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मंदिर हजार वर्षांहून अधिक काळ टिकण्यासाठी बांधले गेले आहे. शास्त्रज्ञांनी अशी रचना तयार केली आहे जी यापूर्वी कधीही केली गेली नव्हती.

राम मंदिराचं बांधकाम नागर शैलीत

चंद्रकांत सोमपुरा यांनी राम मंदिराची वास्तू नागर शैलीनुसार बनवली आहे. त्यांच्या कुटुंबाने १५ पिढ्यांपासून १०० हून अधिक मंदिरांची रचना केली आहे. मंदिराची रचना नागर शैली किंवा उत्तर भारतीय मंदिराच्या रचनेसारखी आहे. सोमपुरा म्हणतात, “स्थापत्यशास्त्राच्या इतिहासात राम मंदिरासारखी वास्तू केवळ भारतातच नाही तर जगात कुठेही क्वचितच पाहायला मिळाली असेल.”

तर, समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले, तीन मजली मंदिराचे एकूण क्षेत्रफळ २.७ एकर आहे. हे ५७ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधले जात आहे. राम मंदिरात लोखंड किंवा स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही, कारण लोखंडाचे वय फक्त ८०-९० वर्षे आहे. वर्षानुवर्षे बांधकाम टिकावे याकरता लोखंड आणि स्टीलचा वापर टाळण्यात आला आहे. मंदिराची उंची १६१ फूट म्हणजेच कुतुबमिनारच्या उंचीच्या ७० टक्के इतकी असेल. NDTV ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हेही वाचा >> अयोध्येतील राम मंदिराची नागर शैली नेमकी आहे तरी काय?

राम मंदिरात ग्रेनाइट, वाळूचा खडक आणि संगमरवराचा वापर

सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकीचे संचालक डॉ. प्रदीप कुमार रामनच्राला म्हणाले, राम मंदिराच्या उभारणीत उत्तम दर्जाचे ग्रेनाइट, वाळूचा खडक आणि संगमरवर वापरण्यात आला आहे. त्यात जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुना वापरण्यात आलेला नाही. झाडांचा वापर करून संपूर्ण रचना तयार करण्यासाठी लॉक आणि की प्रणाली वापरली गेली आहे. राम मंदिराचे हे तीन मजली मंदिर अडीच हजार वर्षांत भूकंपापासून सुरक्षित राहण्यासाठी डिझाइन केले आहे.

वालुकामय जमिनीवर मंदिर बांधणे आव्हानात्मक

नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, मंदिराच्या खालची जमीन वालुकामय आणि अस्थिर होती, अशा ठिकाणी मंदिर तयार करणे हे मोठे आव्हान होते. पण शास्त्रज्ञांनी या समस्येवर चांगला उपाय शोधला आहे. रामनच्राला म्हणाले की, सर्वप्रथम मंदिराच्या संपूर्ण परिसराची माती १५ मीटर खोलीपर्यंत खणण्यात आली.

हेही वाचा >> विश्लेषण: अंकुशपुराण : अस्सल महाराष्ट्रीय रामायण आहे तरी काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरून दिसणारा मंदिराचा भाग राजस्थानातून आयात केलेल्या गुलाबी वाळूच्या ‘बंसी पहारपूर’ दगडापासून बनलेला आहे. CBRI नुसार तळमजल्यावर एकूण १६० खांब आहेत. पहिल्या मजल्यावर १३२ आणि दुसऱ्या मजल्यावर ७४ खांब आहेत, ते सर्व वाळूच्या दगडाने बनवलेले आणि बाहेरील बाजूस कोरलेले आहेत. मंदिराचा गाभारा राजस्थानच्या पांढऱ्या मकराना संगमरवरी बनलेले आहे.