ब्रिटिश खासदार स्टेला क्रिसी यांनी मंगळवारी लहानग्या बाळासह संसदीय चर्चेत भाग घेतला होता. मात्र झोपलेल्या बाळाला चर्चेसाठी आणल्याने अधिकाऱ्यांनी कायद्यावर बोट ठेवलं आहे.लंडनच्या खासदाराने हाऊस ऑफ कॉमन्समधील एका अधिकाऱ्याचा ईमेल ट्वीट केला आहे. त्यात नियमांचा संदर्भ देत मुलासह चेंबरमध्ये बसू असं सांगण्यात आलं आहे. या सूचनेनंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. स्टेला क्रिसी यांनी खासदारांना संपूर्ण मातृत्व कवच मिळावे यासाठी आग्रही आहेत. मात्र घडल्या प्रकाराबद्दल क्रिसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “संसदेतील माता दिसायला किंवा ऐकण्यासाठी नसतात.”, अशी तक्रार त्यांनी केली आहे.

क्रिसी यांना मिळालेल्या वागणुकींवर दोन्ही बाजूच्या खासदारांनी आक्षेप घेतला आहे. सध्याचे नियमांचे पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले गेले आहेत. तर अधिकाऱ्यांनी अशी वागणूक दिल्याचं माहिती नसल्याचं हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष लिंडसे हॉयल यांनी सांगितलं. “लहान मुलांचे पालक सभागृहात सहभागी होऊ शकतात.”, असं त्यांनी जोर देऊन सांगितलं. अध्यक्षांनी असंच सांगताच क्रिसी यांनी आनंद व्यक्त केला. बोरिस जॉन्सन यांच्या पत्नी कॅरी यांनीही सुधारणा करण्यास पाठिंबा दिला आहे. मात्र हा निर्णय हाऊस ऑफ कॉमन्सवर अवलंबून असल्याचं प्रवक्त्यांनी सांगितलं. “कोणत्याही कामाची जागा परिस्थितीनुसार आधुनिक आमि लवचिक असावी. २१ व्या शतकात हेच अपेक्षित आहे.”, असं प्रवक्त्यांनी सांगितलं.

ब्रिटिश सरकारने फेब्रुवारीमध्ये ज्येष्ठ मंत्र्यांसाठी सहा महिन्यांची औपचारिक पगारी प्रसूती रजा सुरू केली.अॅटर्नी-जनरल सुएला ब्रेव्हरमन या नवीन कायद्याचा फायदा मिळविणाऱ्या पहिल्या कॅबिनेट सदस्य होत्या. परंतु बॅकबेंच खासदारांसाठीचे नियम वेगळे आहेत. २०१९ मध्ये क्रेझी तिच्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या वतीने काम करण्यासाठी लोकमची नियुक्ती करणारी पहिली खासदार बनली. मात्र तिला पिपसाठी पुन्हा असे करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.