संघावरही बंदी घाला, PFIवरील बंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसची मोठी मागणी | ban on rss too demand kerala congress leader after ban on pfi | Loksatta

संघावरही बंदी घाला, PFIवरील बंदीच्या निर्णयानंतर विरोधकांची मोठी मागणी

केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

संघावरही बंदी घाला, PFIवरील बंदीच्या निर्णयानंतर विरोधकांची मोठी मागणी
आरएसएस (संग्रहित फोटो)

केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या कारवाईनंतर केरळमधील काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी मोठी मागणी केली आहे. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने पीएफआयवर बंदी घातली आहे, अगदीत तशीच बंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसवर घालावी, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

हेही वाचा >>> पीएफआय ‘सायलेंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…

केरळमधील बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांकडून केला जाणारा जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला समान विरोध व्हायला हवा. पीएफआयप्रमाणेच आरएसएसनेही जातीय द्वेष भडकावण्याचे काम केलेले आहे. त्यांनी समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस हा असा पक्ष आहे, ज्याने या दोन्ही समाजाकडून पसरवण्यात येणाऱ्या जातीवाद आणि सांप्रदायिकतेला विरोध केलेला आहे, असे केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> पीएफआय ‘सायलेंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…

केरळमध्ये काँग्रेस तसेच त्यांचे सहकारी मित्रपक्ष इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) यांनी केंद्र सरकारने पीएफआयवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र पीएफआयसोबतच आरएसएसवरही बंदी, घालावी अशी मागणी आययूएमएलने केली आहे. पीएफआयने तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजात दुफळी निर्माण करण्याचा तसेच द्वेष पसवरण्याचे काम केले. सर्वच इस्लामिक संघटना अतिरेकी विचारांचा निषेध करतात. पीएफआयसारख्या संघटनेने छोट्या मुलांनाही आक्षेपार्ह नारे लगावण्यास परावृत्त केले, अशी प्रतिक्रिया आययूएमएलचे नेते एम के मुनीर यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 13:54 IST
Next Story
“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”