काश्मीरच्या बांदिपोरा सेक्टरमध्ये रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका पोलीस कॉन्स्टेबलला वीरमरण आले. झहीर अब्बास असे शहीद झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अजूनही संघर्ष सुरु आहे. अद्यापही भारतीय जवानांकडून या भागात शोध मोहीम सुरुच आहे.
बांदिपोरामधील हाजिन भागातील मीर मोहल्या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली. भारतीय जवान, सुरक्षा दलाचे जवान आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत संपूर्ण मीर मोहल्याला घेरले. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जवान आणि दहशतवाद्यांच्यातील चकमकीनंतर जवांनाच्या दिशेने दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
#Visuals Bandipora (J&K): Encounter underway b/w security forces & terrorists in Hajin’s Mir Mohalla (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/UI8Pw4Qz88
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI (@ANI)
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. याआधी बंदीपोरा जिल्ह्यातील पराय मोहल्ला हाजीन या भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. या भागात गेल्या काही