पुढे जाऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद मिळवायचे असल्यानेच सध्या मंडळातील कोणीही एन. श्रीनिवासन यांचा राजीनामा मागत नसल्याचे मत माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी मंगळवारी व्यक्त केले. 
आता कोणालाच एन. श्रीनिवासन यांना विरोध करायचा नाहीये. काही जणांना पुढे बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवायचे आहे. आता जर श्रीनिवासन यांना विरोध केला, तर त्यांच्याकडील १० ते १५ मते आपल्याला मिळणार नाही. म्हणूनच मंडळातील कोणीही श्रीनिवासन यांचा राजीनामा मागत नाहीये, असे कीर्ती आझाद यांनी म्हटले आहे.
क्रिकेट मंडळातील सगळ्यांची अवस्था गांधींजींनी सांगितलेल्या तीन माकडांप्रमाणे झालेली आहे. ते सगळेच एकमेकांना सहकार्य करताहेत, अशीही टीका त्यांनी केली.