वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे. प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता. सहा महिन्यानंतर हे हत्याकांड समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यात आता श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताबने जेवणाची ऑर्डर देऊन चित्रपट पाहिल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात केला आहे.

इंडिया टुडेनी दिलेल्या वृत्तानुसार, आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे करून पाण्याने धुण्यासाठी त्याला १० तासांचा कालावधी लागला. थकल्यानंतर आफताबने थोडी विश्रांती घेतली. तेव्हा त्याने झोमॅटोवरून जेवण्याची ऑर्डर दिली. नेटफ्लिक्सवर एक चित्रपट पाहिला. त्यानंतर बिअर पित सिगरेट ओढल्याचं आफताबने पोलीस तपास सांगितलं आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

हेही वाचा : ज्या Bumble डेटिंग अ‍ॅपमुळे आफताब-श्रद्धाची ओळख झाली त्यांनीही मांडली बाजू, म्हणाले “सदस्यांच्या गरजा…”

श्रद्धाचा चेहरा जाळला

दरम्यान, श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केल्यानंतर तिचा चेहरा जाळल्याची कबुली आरोप आफताबने पोलिसांना दिली आहे. श्रद्धाची ओळख लपवण्यासाठी आफताबने हे कृत्य केलं आहे. खूनानंतर शरिराची विल्हेवाट कशी लावायची? याबाबत इंटरनेटवरून माहिती घेतल्याचेही आफताबने पोलिसांना सांगितले आहे.

हेही वाचा : ‘डेक्सटर’ पाहून आफताबप्रमाणेच कुणी भावाचा, तर कुणी आईचा केला खून; एका दिग्दर्शकाचाही समावेश

आफताबची नार्को टेस्ट होणार

आफताबच्या नार्को टेस्टला आता दिल्ली न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यासोबतच, आफताबच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे श्रद्धाचा खून आफताबनंच केला असल्याचा कबुलीजबाब जरी पोलिसांकडे असला, तरी या प्रकरणातलं गूढ उकलण्यात या निर्णयामुळे मोठी मदत होण्याची शक्यता आहे.