पश्चिम बंगालमधील पुरूलिया जिल्ह्यातील एका शासकीय रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत १५ अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उपचारापूर्वी  अर्भकांची प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरू असताना या अर्भकांचा मृत्यू झाला आहे. “मृत्यू झालेल्या १५ अर्भकांमध्ये १० मुलांचा तर, ५ मुलींचा समावेश आहे. यासर्व अर्भकांना श्वसनाचा, कुपोषण, अतिसार आणि मेंदुच्या वेष्टनाचा दाह अशा व्याधींचा त्रास होता” असे सादार देबेन महातो रुग्णालयाच्या मुख्यअधिक्षक निलंजना सेन यांनी सांगितले.
या शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या १५ ते २० अर्भकांच्या उपचारासाठी फक्त १० खाटा उपलब्ध होत्या अशी माहिती समोर आली आहे.