पाठय़पुस्तकातील धडय़ांचे नीट अध्ययन करीत नसल्यामुळे चिडून जाऊन शिक्षिकेने तिसरीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचे डोके भिंतीवर आदळले. त्याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोवीस परगणा जिल्हय़ातील या निर्देशखाली शिशु शिक्षा केंद्रात तिसरीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांचे डोके चंपा मोंडाल या शिक्षिकेने भिंतीवर आपटल्याची घटना १५ एप्रिलला घडली होती. मुलाला अशी अघोरी शिक्षा करणारी शिक्षिका चंपा ही वयाच्या तिशीतील असून तीन ते चार वर्षे अध्यापनाचे काम करीत आहे. तिला आज अटक करण्यात आली.