Sadguru deepfake video : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या नावे डिपफेक व्हिडीओ तयार करुन एका ५७ वर्षीय निवृत्त महिलेली ३ कोटी ७५ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. गुंतवणूक करण्यासंदर्भातला हा व्हिडीओ होता. मात्र तो बनावट व्हिडीओ होता. या व्हिडीओच्या माध्यमातून महिलेची ३ कोटी ७५ लाखांना फसवणूक करण्यात आली. गुरुवारी पोलिसांनी यासंदर्भातली माहिती दिली. सदर महिला बंगळुरुची आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सी.व्ही. रामन नगर या ठिकाणी राहणाऱ्या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. गुंतवणूक करण्यासंदर्भातला हा डीपफेक व्हिडीओ होता. मात्र हा व्हिडीओ बनावट आहे किंवा डीपफेक आहे असं मुळीच वाटणार नाही अशा बेमालुमपणे तयार करण्यात आला होता. सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा खराखुरा व्हिडीओ असेल असाच हा व्हिडीओ आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. २५ फेब्रुवारी २०२३ मध्ये तयार कऱण्यात आलेला हा व्हिडीओ आहे.
फसवणूक नेमकी कशी झाली? महिलेने काय सांगितलं?
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार महिलेने तक्रारीत सांगितलं की मी हा व्हिडीओ पाहिला आणि मला वाटलं की हा व्हिडीओ खरा आहे. मला त्या व्हिडीओनंतर एक लिंक देण्यात आली होती. त्यात इमेल, फोन नंबर आणि इतर माहिती भरायची होती. महिलेने सांगितलं की मी सगळ्या सूचनांप्रमाणे माहिती भरली. त्यानंतर वालिद बी असं नाव सांगत एका माणसाने सदर महिलेला फोन केला. मी मायक्रोरॉक्स कंपनीत काम करतो असं या माणसाने तिला सांगितलं. मायक्रोक्रॉक्स हे स्टॉक ट्रेंडिंग अॅप आहे असं सांगितलं.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
महिलेच्या तक्रारीत सांगितलं की वालिदने ट्रेडिंगचे काही ट्युटोरियल्स झूम कॉलवर घेतले. या दरम्यान मायकल नावाच्या इसमाशी ओळख करण्यात आली. त्यानंतर नफा कसा मिळतो? गुंतवणूक कशी करायची? यासंदर्भातले तपशील देण्यात आले. त्यानंतर एप्रिल २३ पासून माझ्याकडून विविध प्रकारे पैसे गुंतवणुकीसाठी जमा करुन घेण्यात आले. आत्तापर्यंत ३ कोटी ७५ लाखांची फसवणूक झाल्याचं या महिलेने सांगितलं आहे. पोलिसांनी या संदर्भातली तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणी आम्ही तपास करत आहोत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान हा जो व्हिडीओ आहे तो अत्यंत बेमालुमपणे तयार करण्यात आला होता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. महिलेनं मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर, फसवणुकीच्या प्रकरणानंतर जवळपास पाच महिन्यांनी तक्रार दाखल झाली आहे. या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की जे पैसे लुटण्यात आले आहेत ते परत मिळवणं कठीण आहे. जे तपशील फसवणूक करणाऱ्यांनी दिले होते ते आम्ही तपासतो आहोत. दरम्यान या प्रकरणा सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला आणि फसवणुकीसाठी वापर करण्यात आला. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयातही हे प्रकरण गेलं आहे.