अगोदर पूराच्या थैमानामुळे संकटात असलेल्या बिहारमध्ये आता आणखी एक भयानक घटना घडली आहे. येथील नवादा जिल्ह्यातील धनापूर गावात वीज कोसळून आठ बालकांचा मृत्यू तर अन्य नऊ जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
Bihar: 8 children dead & 9 injured after lightning struck Dhanapur village in Nawada. More details awaited. pic.twitter.com/qU9LD5w8L2
— ANI (@ANI) July 19, 2019
सर्व जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.