पाटणा : सरकार तपास करीत असलेले आणि हक्कभंग समितीकडेही पाठवण्यात आलेले एखादे प्रकरण सभागृहात ‘वारंवार’ उपस्थित करता येऊ शकते काय, यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार व अध्यक्ष विजय कुमार यांच्यात खडाजंगी झाल्यामुळे बिहार विधानसभेत सोमवारी तिखट प्रसंग उद्भवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपला मतदारसंघ असलेल्या लखिसरायमध्ये घडलेल्या घटनेबाबत काय कारवाई केली याची सभागृहाला माहिती द्यावी, असे अध्यक्षांनी मंत्री बिजेंद्र यादव यांना दोन दिवसांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उठून संताप व्यक्त केला. ‘सरकारच्या वतीने उत्तर देण्याचे अधिकार मंत्र्यांना देण्यात आले आहेत. या घटनेबाबत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले असताना, तुम्ही त्यांना दोन दिवसांनंतर पुन्हा उत्तर द्यायला सांगता. हे नियमाविरुद्ध आहे. कृपया घटनेत काय लिहिले आहे ते पाहा’, असे कुमार म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar chief minister nitish kumar loses temper over assembly speaker zws
First published on: 15-03-2022 at 03:56 IST