बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी २० फेब्रुवारी रोजी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्यासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे.दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीला राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी संबोधित केल्यानंतर  विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जद(यू)ला विरोधी बाकांवर बसण्याची अनुमती द्यावी आणि भाजपऐवजी जद(यू) विधिमंडळ पक्षाचे नेते विजय चौधरी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे का, असे विचारले असता हा विषयही बैठकीत चर्चिला जाईल, असे सांगितले.