बिहारमधील हरखेन कुमार जैन धर्मशाळेत सकाळी बॉम्बस्फोट झाला असून यात एक जण जखमी झाला आहे तर बॉम्बस्फोट घडवणारे चारजण फरार असल्याचं वृत्त समजत आहे. या घटनेनंतर धर्मशाळा परिसरात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  पोलीस चार फरार दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. जखमी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पाच वाजता हे दहशतवादी कोलकातावरून ट्रेनने या परिसरात आले होते. मोठा घातपात घडवण्याचा त्यांचा कट होता.

भोजपूर जिल्ह्यातील आरा येथील बडीचौकी जवळ ही धर्मशाळा आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे पाचही जण सकाळी पाच वाजताच्या सुमारास आले होते. त्यातल्या एका संशयिताच्या बॅगमध्ये कमी तीव्र क्षमतेचा स्फोट झाला आणि तो जखमी झाला. तर त्याचे उर्वरित चार साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाले. या चारही जणांचा पोलीस शोध घेत आहेत. बॉम्बस्फोट झाल्याने या परिसरात धावपळ उडाली. बॉम्बविरोधी पथकानेही घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे. तर जखमी संशयिताची पोलीस कसून चौकशी करत आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून पोलिसांना पिस्तुलही सापडली आहे.