प्रेमात फसवणूक झाल्यानंतर प्रियकर किंवा प्रेयसी जास्तीत जास्त शब्दांमधुन आपला राग व्यक्त करतात. काही वेळा आपल्या पद्धतीने जोडीदाराला धडा शिकवला जातो. पण बिहारच्या नालंदामध्ये एका मुलीने जे केलं, ते पाहून सर्वचजण अवाक झाले. संपूर्ण नालंदामध्ये ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. आज तकने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय केलं प्रेयसीने?

प्रियकराने आपली फसवणूक करुन दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटलाय हे समजल्यानंतर प्रेयसीने फक्त शब्दांमधुन आपला राग व्यक्त केला नाही किंवा प्रियकराच्या घरी जाऊन गोंधळ घातला नाही. तिने थेट प्रियकराच्या घरात घुसून नववधूला मारहाण केली. तिचे केस कापले व फेविक्विकने तिचे डोळे चिकटवले. संतापाच्या भरात मुलीने केलेले हे कृत्य पाहून सर्वचजण अवाक झाले आहेत.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चौकशी सुरु केली. आरोपी मुलगी आणि नवरदेवाचे प्रेम प्रकरण सुरु होते. पण त्याने एक डिसेंबर रोजी शेखपुरा जिल्ह्यात दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले.

प्रियकराच्या लग्नाबद्दल समजल्यानंतर संतापलेली प्रेयसी जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. तिने झोपेत असलेल्या नववधूचे केस कापले व फेविक्विकने तिचे डोळे चिकटवले. त्यानंतर नवरीला जबर मारहाण केली. हा सर्व गोंधळ सुरु असताना नातेवाईक तिथे पोहोचले व त्यांनी आरोपी मुलीला पकडले.

पोलिसांनी आरोपी युवतीला अटक केली आहे. नववधूला रुग्णालयात दाखल केलं आहे. तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोरा तालाब गावातील ही घटना आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar nalanda girl friend attack bride of boyfriend cut her hair police arrest girl dmp
First published on: 03-12-2020 at 09:15 IST