बिल अ‍ॅण्ड मेलिंदा गेट्स प्रतिष्ठानचे विश्वस्त बिल गेट्स यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेऊन कुटुंब नियोजन आणि लसीकरण कार्यक्रमाबाबत चर्चा केली.

मातृत्व, बालआरोग्य, संसर्गजन्य विकार आणि काळ्या आजाराचे निर्मूलन याबाबत एकत्रित काम करण्याची इच्छा प्रतिष्ठानच्या वतीने या वेळी व्यक्त करण्यात आली.