भाजपाला असं वाटतं आहे की ते कायम सत्तेत राहतील. भारतात कायम भाजपाची सत्ता असेल असं भाजपाला वाटतं आहे मात्र तसं होणार नाही हे विसरू नका असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. लंडनमध्ये राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा कालावधी लक्षात घेतला तर सर्वाधिक काळ काँग्रेसने भारतावर राज्य केलं आहे. भाजपाची सत्ता दहा वर्षे आहे. त्याआधी दहा वर्षे आम्हीही सत्तेत होतो.भाजपाला असं वाटतं आहे की ते दहा वर्षांपासून सत्तेत आहेत तर येत्या काळातही तेच सत्तेवर राहतील. कायम तेच सत्तेत राहतील असं त्यांना वाटतं आहे. मात्र तसं होणार नाही. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली होती.

kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
Bachhu Kadu amravati rally
अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”

राहुल गांधी विदेशात आहेत. केंब्रिजमधल्या भाषणातही राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांचं वक्तव्य समोर आलं आहे. केंब्रिजमधल्या भाषणात राहुल गांधी यांनी चीनच्या धोरणाचं कौतुकही केलं होतं. त्यानंतर राहुल गांधी हे देशाला बदनाम करत आहेत अशीही टीका भाजपाने केली होती.

सोमवारी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. भाजपाने हे कधीही समजू नये की ते कायम सत्तेत राहतील हे त्यांनी कारण सत्ता येते आणि जाते. २०१४ पर्यंत आम्ही सत्तेत होतो उद्या भाजपाचीही सत्ता जाईल हे त्यांनी विसरू नका असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपाला सुनावलं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधींवर टीका होण्याची चिन्हं आहेत.