आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर भाजपा सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, असे वक्तव्य  जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. भाजपा नेते आता निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर उत्तर प्रदेशातील अनेक गावात प्रवेश करू शकत नाहीत, असेही राज्यपालांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले “मी मेरठचा आहे. माझ्या भागात भाजपाचा कोणताही नेता कोणत्याही गावात प्रवेश करू शकत नाही. मेरठमध्ये, मुझफ्फरनगरमध्ये, बागपतमध्ये ते प्रवेश करू शकत नाहीत.”

शेतकऱ्यांसोबत उभे राहण्यासाठी ते आपले पद सोडणार का, असे विचारले असता मलिक म्हणाले की, “मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि सध्या माझं पद सोडण्याची गरज नसली तरी गरज पडल्यास मी तेही करेन.” मलिक हे पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट नेते आहेत. “ शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान, गृहमंत्री, सर्वांशी भांडलो आहे. मी सर्वांना सांगितले आहे की तुम्ही चुकीचे करत आहात, हे करू नका. जर सरकारने कायदेशीररित्या एमएसपीची हमी दिली, तर हे आंदोलन संपू शकतं. शेतकरी तीन कायदे रद्द करण्याचा सोडू शकतात कारण सर्वोच्च न्यायालयाने ते स्थगित केले आहे. आता फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे एमएसपी हमीची. तुम्ही ते का करत नाही, एमएसपीशिवाय काहीही होणार नाही,” असं मलिक म्हणाले.

मेघालयच्या राज्यपालांनी पंतप्रधानांना सार्वजनिकपणे कोणताही संदेश देणार नकार दिला. तसेच या लोकांना सिखांबद्दल माहिती नाही. त्यांना त्रास द्यायला नको. सिखांचे निःशसत्र गुरु मुघल बादशहाशी लढले होते, हे लक्षात ठेवावं असंही मलिक म्हणाले. जर सरकारने केंद्र आणि शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी करण्यास विचारलं तर आपण तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं.