महाराष्ट्रानंतर आता गोव्यातील राजकारण तापताना दिसत आहे. गोवा काँग्रेसमधील ११ आमदारांपैकी पाच आमदार बंडखोरीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच हे आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसच्या आमदारांच्या बंडखोरीशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

पाच आमदार बंडखोरीच्या मार्गावर असण्याची शक्यता

सोमवारी रात्री पणजीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला काँग्रेसचे दहा आमदारही उपस्थित होते. काँग्रेसचे पाच आमदार मायकल लोबो, दिगंबर कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डेलियाला लोबो यांच्याशी रविवारी संपर्क होऊ शकला नसल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांचे विश्वासू मुकुल वासनिक यांना तातडीने गोव्याला पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- “आडमार्गाचं राजकारण देशासाठी विध्वंसक ठरू शकतं”, पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यावर आरोप

काँग्रेसने मायकल लोबो आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पक्षात फूट पाडण्यासाठी सत्ताधारी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून लोबो यांना हटवले होते.

गोवा काँग्रेस पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडू यांची टीका

लोबो यांची पदावरून हकालपट्टी झाल्याची घोषणा करताना पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले की, या लोकांनी काँग्रेससोबत राहून सत्ता उपभोगली, पण आज हे लोक लोभी झाले आहेत. मी मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्या कृतीबद्दल खूप निराश आहे.

हेही वाचा – गर्भनिरोधकांचा सर्वाधिक वापर मुस्लीमच करतात; असदुद्दीन ओवेसींचं योगी आदित्यनाथांना प्रत्युत्तर!

लोकशाही नाही पैसेशाही
गोव्यात ओढवलेल्या रा़जकीय संकटावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी वक्तव्य केले आहे. ही लोकशाही नाही पैसेशाही असल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी केली आहे