महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा भाजपाचा मध्य प्रदेश येथील मीडिया संपर्क प्रमुख अनिल सौमित्र याचं भाजपाने निलंबन केलं आहे. महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं अनिल सौमित्रला महागात पडलं आहे. महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, भारतात त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र जन्मले काही लायक निघाले काही नालायक अशी पोस्ट अनिल सौमित्र यांन केली होती. त्याची तातडीने दखल घेऊन अनिल सौमित्र यांना निलंबित करण्यात आले आहे.

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, दहशतवादी नाही. असे वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांना पक्षाने झापले आहे. एवढंच नाही तर या वक्तव्याबाबत साध्वी प्रज्ञाला कधीच माफ करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्याची दखल घेऊन साध्वी प्रज्ञा यांनाही पक्षाने झापले. ज्यानंतर पक्षाची आणि माझी भूमिका एकच आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. एवढंच नाही तर अनंतकुमार हेगडे, नलीन कटील यांची जी वक्तव्यं समोर आली त्याप्रकरणी त्यातूनही भाजपाने अंग काढून घेतलं. या लोकांनी जी मतं माडंली त्याची जबाबदारी भाजपा घेणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं.

लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या टप्प्याचं मतदान अवघ्या दोन दिवसात होणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी निकाल लागणार आहे.याआधीच महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे.