चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मीरवाइज उमर फारूखची जीभ कापून आणणाऱ्या व्यक्तीस मध्य प्रदेशच्या एका भाजप नेत्याने १० लाख रूपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजराज जाटव असे या भाजप नेत्याचे नाव आहे. जर मीरवाइजला पाकिस्तानवर इतकंच प्रेम असेल तर त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत पाकिस्तानला गेलं पाहिजे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला पराभूत करणाऱ्या पाकिस्तानच्या विजयावर जल्लोष करणाऱ्या मीरवाइजची जीभ कापून आणणाऱ्यास १० लाख रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करतो, असे जातव यांनी या वेळी म्हटले.

गत रविवारी पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर त्यांना मीरवाइजने शुभेच्छा दिल्या होत्या. त्यापूर्वीही श्रीलंकेला पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानला त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

जाटव म्हणाले, मीरवाइजच्या या कृत्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, स्वातंत्र्यानंतर जे मुस्लिम पाकिस्तानात गेले आहेत. त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, याची जाणीवही त्यांनी करून दिली.

त्यांनी लक्षात ठेवावं की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह या देशाच्या मातीतच दफन केला जाणार आहे. तरीही ते पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर आपल्या धर्मातील इतर लोकांचीही ते दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या लोकांनी माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून काही तरी शिकायला हवे. त्यांनी कायम भारताच्या हिताचा विचार केला, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

जाटव हे स्वत: भाजपच्या कुठल्या पदावर नाहीत. पण त्यांची पत्नी संजू जाटव या जनपद पंचायतच्या प्रमूख आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader gajraj jatav announces 10 lakh reward for mirwaiz umar farooqs tongue
First published on: 23-06-2017 at 16:08 IST