मागील काही काळापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नितीन गडकरी यांचं भाजपात खच्चीकरण केलं जात असेल, तर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, अशा ऑफर त्यांना दिल्या जात आहे. नितीन गडकरींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांना साथ देऊ, असं विधान अलीकडेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

या सर्व घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या ऑफरबाबत स्पष्ट विधान केलं आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा स्वयंसेवक आहे. मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणे काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Ajit Pawar, Rahul Gandhi,
अजित पवारांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : म्हणाले, “राहुल गांधींचे ‘खटाखट’, तर माझे ‘कचाकचा’…”

हेही वाचा- “आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे” शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांचं थेट विधान, म्हणाले…

काँग्रेसकडून देण्यात आलेल्या ऑफरबाबत स्पष्टीकरण देताना नितीन गडकरी म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मी माझ्या विचारांसाठी राजकारणात आलो. त्यामुळे माझ्या विचारधारेशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मला कुणी आमंत्रण द्यावं किंवा कुणी काय बोलावं? हा त्यांचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता आहे. त्यामुळे मी माझ्या सिद्धांताप्रमाणे आणि विचाराप्रमाणे आयुष्यभर काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे, असं स्पष्ट विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे.

हेही वाचा- “..तर काँग्रेसमध्ये या, आम्ही साथ देऊ”, नाना पटोलेंची नितीन गडकरींना थेट ऑफर

खरं तर, काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.