Sonali Phogat Death Case: भाजपा नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. सोनाली यांच्या मृत्यूबाबत फोगट कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर सातत्याने फोगट कुटुंबीय आणि हरियाणा सरकारकडून या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी करण्यात येत होती. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे.

गोव्यातील ‘कर्लीज’ रेस्तराँच्या पाडकामाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, सोनाली फोगाट यांचा काय संबंध?

सोनाली फोगट यांचा गेल्या महिन्यात गोव्यामध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. प्रथमदर्शनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांचा घातपात झाल्याचा आरोप फोगट कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार सोनाली यांच्या शरिरावर जखमा आढळून आल्याचे निष्पन्न झाले होते. या अहवालानंतर गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांना अंमली पदार्थ दिल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत काही जणांना अटक करण्यात आली आहे.

Video : सोनाली फोगट मृत्य प्रकरण, पार्टीदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोगट कुटुंबीय गोवा पोलिसांच्या तपासाबाबत असमाधानी असल्यास सीबीआयकडे हे प्रकरण सोपवले जाईल, असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले होते. त्यानंतर आज गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तपासाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. दरम्यान, सोनाली फोगट यांच्या फार्महाऊसमधून तीन महागड्या कार आणि फर्निचर गायब असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट यांच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहने होती. ही वाहने सध्या गायब आहेत.