जम्मू व काश्मीरवरून सरकार स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप याबाबत सर्व शक्यता पडताळून पहात असल्याचा पुनरुच्चार पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. केव्हाही याबाबत निर्णय येईल असे त्यांनी स्पष्ट केले.राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊन १२ दिवसांनंतर सरकार स्थापनेबाबत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.८७ सदस्य असलेल्या जम्मू व काश्मीर विधानसभेत सर्वाधिक २८ जागा पीडीपीला मिळाल्या आह