राजस्थानमधील अलवर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार महंत चांदनाथ यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ६१ वर्षाचे होते. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भाजप खासदार महंत चांदनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी जुलैमध्ये मठाच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली होती. बालकनाथ हे माझे उत्तराधिकारी असतील असे त्यांनी स्पष्ट केले होते. या कार्यक्रमाला योगगुरु रामदेवबाबा आणि योगी आदित्यनाथ हेदेखील उपस्थित होते. महंत चांदनाथ यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी रात्री उशीरा त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच राजस्थानसह हरयाणा आणि दिल्लीत चांदनाथ यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली.

satej patil kolhapur lok sabha marathi news
“…तर रात्री बारा वाजता काठी घेऊन तेथे यायला बंटी पाटील तयार”, सतेज पाटील यांचा इशारा
Ranajagjitsinha Patil - Om Rajenimbalkar
“…तर राजकारण सोडून देईन”, ओमराजेंनी तेरणा महाविद्यालयावरून केलेल्या आरोपांवर राणा पाटलाचं उत्तर
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Congress MLA Vishwajit Kadam Pushes for Vishal Patil to Contest Sangli Lok Sabha Seat Meets High Command
दिल्लीनंतर नागपूरकडे धाव; सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम…

चांदनाथ यांचा जन्म २१ जून १९५६ रोजी दिल्लीतील बेगमपूर येथे झाला होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी अध्यात्मचा मार्ग स्वीकारला. हरयाणातील रोहतक आणि राजस्थानच्या हनुमानगड येथे चांदनाथ यांच्या संस्थेतर्फे रुग्णालय सुरु करण्यात आले होते. मस्तनाथ विद्यापीठाचे ते कुलगुरूही होते. चांदनाथ यांच्या निधनाचे वृत्त समजताच अलवरमध्ये शोककळा पसरली. रविवारी भाजपतर्फे अलवरमध्ये आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपच्या अलवरमधील जिल्हाध्यक्षांनी दिली. रविवारी संध्याकाळी चांदनाथ यांच्यावर रोहतकमधील आश्रमात अंत्यसंस्कार केले जातील.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अलवारमध्ये चांदनाथ यांनी काँग्रेसच्या जितेंद्र सिंह यांचा पराभव केला होता.