नवी दिल्ली : काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. अमेरिकेत मूर्खपणे टिप्पणी करून राहुल गांधी यांनी देशद्रोह केला असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारताची जी प्रतिमा सादर केली त्यामुळे देशवासीयांना जबर धक्का बसला असल्याचे ते म्हणाले. संसदेत विरोधी पक्षनेतेपदी असल्याचा अहंकार आणि त्यांचा मूर्खपणा अमेरिकेत दिसून आला असल्याची टीका त्यांनी केली. जेव्हा जातीविरुद्ध, धर्माविरुद्ध द्वेष पसरविला जातो आणि परदेशात व देशात शिखांबाबत कठोर भाष्य केले जाते, तेव्हा तो देशद्रोह समजला जातो, असे पात्रा म्हणाले.

हेही वाचा >>> Arvind Kejriwal Bail Hearing Today : केजरीवाल यांच्या जामिनावर आज निर्णय

परदेशी भूमीवर भारताची भूमिका योग्य दृष्टिकोनातून सादर करणे ज्या व्यक्तींना समजत नाही तेच ‘आपल्या मातृभूमी’ला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याची टीकादेखील पात्रा यांनी पक्ष मुख्यालयात पत्रपरिषदेत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पनौती’ कोण आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे. ‘पप्पू’ आणि ‘पनौती’ एकत्रच चालतात. पप्पूने ज्यालाही स्पर्श केला त्याचा नाशच झाला. तेच काँग्रेसचे सर्वात मोठे ‘पनौती’ आहेत. गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत ते आहेत; तोपर्यंत काँग्रेस पुढे जाणार नाही. इंधनच नसल्याने त्यांचे रॉकेट प्रक्षेपित होणार नाही, हे लिहून घ्या.– संबित पात्रा, मुख्य प्रवक्ते, भाजप