भाजपाविरोधातील विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया नाव दिल्यापासून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. यावरून काँग्रेसकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी यावर आक्षेप घेण्यासाठी थेट राज्यघटनेचा संदर्भ दिला आहे. यावरून वाद चालू असताना दुसरीकडे भाजपाकडून मात्र याचं समर्थन केलं जात आहे. यात काहीही चुकीचं नसल्याचं भाजपाचं म्हणणं आहे.

नेमकं काय घडलं?

President of Bharat असा उल्लेख असणारं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं. हे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी २० परिषदेतील सदस्य राष्ट्रप्रमुखांना सहभोजनाचं आमंत्रण देण्यासाठी पाठवल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रामध्ये President of India हा उल्लेख बदलून President of Bharat असा उल्लेख करण्यात आल्याचा मुद्दा काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?

President of Bharat: राष्ट्रपती भवनाच्या पत्रावरील ‘त्या’ उल्लेखावरून वाद; ‘इंडिया’ नाव हटवलं?

केंद्र सरकारने १८ सप्टेंबर रोजी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात इंडिया हा शब्दच हटवण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर हे पत्र व्हायरल झाल्यामुळे इंडिया नावाला सत्ताधारी पक्षाचा विरोध असल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी राज्यघटनेचा संदर्भ दिला आहे. ““घटनेच्या कलम ५२ नुसार Constitution of India असा उल्लेख आहे. भारतात President of India असू शकतात. यापेक्षा अजून कुठला पुरावा आवश्यक आहे?” असं ट्वीट मनीष तिवारी यांनी केलं आहे.”

भाजपाचं काँग्रेसवर टीकास्र!

दरम्यान, यासंदर्भात भाजपाकडून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं आहे. “काँग्रेसला देशाच्या सन्मानाशी संबंधित प्रत्येक गोष्टीची अडचण का असते? भारत जोडोच्या नावावर राजकीय यात्रा करणाऱ्यांना भारत माता की जयच्या घोषणेमुळे इतका संताप का येतो? हे स्पष्ट आहे की काँग्रेसच्या मनात ना देशाबद्दल सन्मान आहे, ना देशाच्या राज्यघटनेबद्दल. त्यांना फक्त एका कुटुंबाचा कौतुकसोहळा करण्यामध्ये रस आहे”, अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे.

दरम्यान, भाजपाचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “मला कळत नाहीये की यात चुकीचं काय आहे? आपला देश भारतच आहे. मग President Of Bharat म्हणण्यात अडचण कुणाला आहे? काँग्रेसला सगळ्यातच समस्या दिसते. आपण भारत नाही म्हणणार तर काय म्हणणार?” असा सवाल राजीव चंद्रशेखर यांनी केला आहे.