इशरतजहाँप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांना काही आदेश दिल्याच्या भाजपने केलेल्या आरोपाचे काँग्रेसने बुधवारी खंडन केले. इशरतजहाँप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. सुरू असलेली सुनावणी का बंद करण्यात आली त्यामागील खरा उद्देश जाहीर करावा, असे आव्हानही काँग्रेसने दिले.