मंदिर -मशीद वादावर भाजपा नेत्याचे विधान; म्हणाले मशिदी बांधण्यासाठी मुघलांनी ३६ हजार मंदिरे पाडली, आता…

उजव्या विचारसरणीच्या एका गटाने प्रशासनाला मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी मागणारी याचिका सादर केली आहे.

मशिदी बांधण्यासाठी मुघलांनी ३६ हजार मंदिरे नष्ट केली आली असून त्या मंदिरांचे भाजपा पुनरुज्जीवन करेल, असे विधान कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते के.एस ईश्वरप्पा यांनी केले आहे. तसेच त्यांना इतरत्र मशिदी बांधू द्या आणि प्रार्थना करू द्या, परंतु आम्ही त्यांना मंदिरांवर मशिदी बांधण्याची परवानगी देऊ शकत नसल्याचेही ईश्वरप्पा म्हणाले.

कर्नाटकात मशिदीखाली सापडली मंदिरासारखी वास्तूशिल्प

२१ एप्रिल रोजी कर्नाटकात मंदिर-मशीद वाद समोर आला. जेव्हा मंगळुरूच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी वास्तुशिल्प रचना सापडली. काहींनी असे म्हटले आहे, की मशिद बांधण्यापूर्वी या ठिकाणी मंदिर अस्तित्वात होते. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे.

हनुमान मंदिरावर मशीद बांधली गेल्याचा दावा

श्रीरंगपट्टणात हनुमानाचे मंदिर होते हे आज मुस्लिमही मान्य करत आहेत. त्या काळात त्यांनी मंदिर दुसरीकडे हलवले आणि हनुमान मंदिर वाचवले, पण मंदिर का हलवण्यात आले? त्या जागी मशीद का बांधण्यात आली?” यावर काँग्रेस काय म्हणते? असा प्रश्नही ईश्वरप्पा यांनी केला आहे. उजव्या विचारसरणीच्या एका गटाने प्रशासनाला मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी मागणारी याचिका सादर केली आहे. मशीद हनुमान मंदिरावर बांधली गेली होती आणि हिंदू देवतांच्या मूर्ती अजूनही मशिदीत आहेत असा या गटाचा आरोप आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp will revive 36000 temples destroyed by mughals ex karnataka minister k eshwarappa dpj

Next Story
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षाचा तुरुंगवास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी