माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून झारखंडमध्ये दोन महिलांसह तिघांना स्वत:चीच विष्ठा खाण्यास भाग भाग पाडले आहे. या अमानवी कृत्याची सर्वच स्तरावर टीका होत आहे.
झारखंडमधील गिरिदिह शहरात जादूटोण्याच्या संशयावरून दोन महिलांसह तिघांना स्वत:चीच विष्ठा खाण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना झाल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. या प्रकरणी मंगळवारी उशिरा चार जणांना स्थानिक पोलिसांनी झांजरी भागात पकडण्यात आले. यापैकी दोन महिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही विकृती समोर आली.
दोन महिलांसह तीन जण जादूटोणा करतात. त्यामुळे लोक आजारी पडतात, या संशयावरून लोकांनी त्यांना विष्ठा खाण्यास भाग पाडले. नगर पोलिस स्टेशनचे प्रमुख अदिकांत महातो यांनी सांगितले, की वीरा दास (५०), हरी दास (३२), झारिया देवी (३०), शांती देवी (४८) यांना अटक करण्यात आली असून दोन जण फरारी आहेत. .याआधी एका घटनेत दोन महिलांसह चार वयस्कर आदिवासींना गुमला जिल्ह्य़ात जादूटोण्याच्या संशयावरून ठार मारण्यात आले होते.
या प्रकरणी पोलीस आधिक तपास करत आहे. फरार आरोपींना लवकरच पकडू अशी माहिती पोलिसांनी दिली.