मोदी सरकारकडून परदेशात दडवण्यात आलेला काळा पैसा हुडकून काढण्यासाठी युद्धपातळीवर मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये सरकारी यंत्रणांचे सर्वात जास्त लक्ष हे स्वीस बँकेतील काळ्या पैशावर होते. या पार्श्वभूमीवर अवैध मार्गाने पैसा जमवणाऱ्यांनी आपल्याकडील काळा पैसा लपविण्यासाठी अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली होती. भारतीयांकडून आता काळा पैसा लपवण्यासाठी आशिया खंडातील देशांना पसंती दिली जात आहे. बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सने (बीआयएस) याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. भारतीयांनी परदेशांमध्ये लपवलेला काळा पैसा हा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३ टक्के असल्याचे बीआयएसचा दावा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१५ पर्यंत भारतीयांनी ४ लाख कोटी रुपये परदेशातील बँकांमध्ये जमा केले होते. २००७ ते २०१५ या कालावधीत परदेशात जमा करण्यात आलेल्या भारतीयांच्या पैशांमध्ये ९० टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘बीआयएस’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. याआधी काळा पैसा लपवण्यासाठी भारतीयांकडून स्वीस बँकांना पसंती दिली जात होती. मात्र, आता यामध्ये बदल झाला आहे. आता बहुतांश भारतीयांकडून त्यांचा काळा पैसा हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ यासारख्या आशियाई देशांमधील बँकांमध्ये ठेवला जातो. भारतीयांनी परदेशात लपवलेल्या एकूण पैशांचा विचार केल्यास आशियाई देशांमध्ये तब्बल ५३ टक्के काळा पैसा ठेवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black money indians preferring asian tax heaven countries for depositing offshore wealth
First published on: 14-09-2017 at 16:55 IST