scorecardresearch

पेशावरमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीत भीषण स्फोट, ९० जण जखमी

पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Blast in Peshawar Mosque
पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (PC : AP)

पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. पाकिस्तानी न्यूज वेबसाईट डॉन डॉट कॉमने या स्फोटाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. वेबसाईटवरील माहितीनुसार दुपारी १.४० वाजता हा स्फोट झाला. ही मशीद पेशावरमधील सिव्हिल लाईन्स येथे आहे. स्फोट झाला तेव्हा मशिदीत लोक नमाज अदा करत होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या स्फोटात ९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मशिदीत नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यामुळे या स्फोटात ९० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती डॉन न्यूजने प्रसिद्ध केली आहे. स्फोटामुळे मशिदीचा बराचसा भाग कोसळला आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. या स्फोटानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आता तिथे बचावकार्य सुरू आहे.

हे ही वाचा >> भारत जोडो समारोप यात्रेत प्रियांका गांधी यांचे जोरदार भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

बहुतांश जखमींची स्थिती नाजूक

स्फोटात जखमी झालेल्या लोकांना तात्काळ जवळच्या लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद आसिम यांनी सांगितलं की, रुग्णालयात ७० जणांना दाखल करण्यात आलं आहे. यापैकी बरेचसे लोक गंभीर स्थितीत आहेत. रुग्णालयाच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. या रस्त्यावर केवळ रुग्णवाहिकांना ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:20 IST

संबंधित बातम्या