राजधानी दिल्लीतल्या गाझीपूर इथल्या फूल बाजारात स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्यानं आता मोठी खळबळ माजली आहे. दिल्ली पोलिसांनी ही स्फोटकं जप्त केली आहेत. त्याचबरोबर ही बॅग आढळलेला परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी बॅग जप्त करून घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅग जप्त केल्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला गाझीपूर फूल बाजारात पाठवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या काही गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्पेशल सेलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नॅशनल सिक्युरिटी गार्ड या दहशतवादविरोधी दलालाही घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

नक्की घडलं काय?

पूर्व दिल्लीतल्या गाझीपूर फूल बाजारात एक बेवारस बॅग आढळून आली होती. या बॅगबद्दलची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी बॅग आढळलेला परिसर रिकामा केला आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला घटनास्थळी बोलावून घेतलं. हे पथक आल्यानंतर त्यांनी जेसीबी मागवून एक खोल खड्डा खणून बॉम्ब निकामी केल्याची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

हा बॉम्ब फुटल्यानंतर झालेल्या स्फोटाचा व्हिडीओही हाती येत आहे. त्यावरून हा बॉम्ब प्रचंड मोठ्या क्षमतेचा होता हे सिद्ध होत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomb gazipur flower market delhi diffused by delhi police vsk
First published on: 14-01-2022 at 15:26 IST