scorecardresearch

Premium

खळबळजनक: दोघांचं एकाच तरुणीवर जडलं प्रेम, बड्या उद्योजकाच्या मुलाने मित्राची केली हत्या

प्रेमप्रकरणातून एका उद्योजकाच्या मुलाने मित्राची निर्घृण हत्या केली आहे.

love trangle
(प्रातिनिधिक फोटो-Pixels)

गुजरातमधील अहमदाबाद येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका १८ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी तरुणाने मित्राला भेटायला बोलावून घात केला. यानंतर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात मृतदेह घेऊन जात घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार स्वप्नील प्रजापती (वय-२२) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर वेदान्त राजा असं १८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी वेदान्त हा अहमदाबादमधील नामांकित विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडील न्यूझीलंडमध्ये उद्योजक आहेत. आरोपीनं रविवारी पहाटे मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह आपल्या एसयूव्ही कारमधून पोलीस ठाण्यात नेला.

kolhapur, two murder in kolhapur, kolhapur crime news,
कोल्हापूरात खूनाचे सत्र; कुडित्रेत मद्यपीकडून वृद्धाचा खून, इचलकरंजीत तरुणाची निर्घृण हत्या
Investors adopted a cautious stance in the backdrop of monetary policy by the Reserve Bank
पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद
Youth Arrest in Delhi Unnatural sex
अनैसर्गिक संबंध ठेवण्याच्या दबावाला कंटाळून २० वर्षांच्या मुलाने केली मित्राची हत्या
dombivli, woman killed husband with lover, woman killed her husband dombivli
डोंबिवलीत प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची मित्राच्या मदतीने हत्या, आडिवलीतील विहिरीतील मृतदेहाची ओळख पटली

हेही वाचा- १७ वर्षीय मुलीचं गावातून अपहरण; परराज्यात नेत दोन महिने वारंवार बलात्कार, नराधमाला अखेर अटक

“माझी कार पार्किंगमध्ये आहे, त्यात एक मृतदेह आहे” अशी माहिती आरोपीनं सोला पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने कारच्या दिशेनं धाव घेतली असता कारच्या समोरील सीटवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत स्वप्नीलचा मृतदेह आढळला. स्वप्नीलच्या अंगावर चाकूने वार केलेले तीव्र व्रण आढळले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वेदान्त राजाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं.

हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

आरोपी वेदान्त राजाविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये स्वप्नीलचे वडील हसमुख प्रजापती यांनी सांगितलं, “माझा मुलगा स्वप्नील शनिवारी दुपारी घराबाहेर गेला. संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे मी त्याला रात्री आठच्या सुमारास फोन केला होता. पण त्याने मला त्याच्या ठावठिकाणाबद्दल काहीही सांगितलं नाही. त्यानंतर रविवारी सकाळी सोला पोलीस ठाण्यात कारमध्ये माझ्या मुलाचा मृतदेह आढळला.”

हेही वाचा- जंगलात फिरायला गेलेल्या जोडप्याचा पोलिसांकडून लैंगिक छळ, तीन तास डांबून ठेवलं अन्…

सोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एच सोलंकी यांनी सांगितलं की, स्वप्नील आणि वेदान्त राजा हे एकाच मुलीवर प्रेम करत होते. या प्रेमप्रकरणातून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी संध्याकाळी आरोपी वेदान्तने स्वप्नीलला फोन करून त्याला विश्वकर्मा पुलाजवळ भेटण्यास बोलावलं. येथे गेल्यानंतर आरोपीनं चाकुने वार करत स्वप्नीलची हत्या केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Both love same girl son of businessman killed friend stabbed with knife crime in ahmedabad rmm

First published on: 16-10-2023 at 16:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×