पीटीआय, श्रीनगर

जम्मू-काश्मीर विधानसभेचे कामकाज विशेष दर्जाच्या मुद्द्यावरून गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी तहकूब करावे लागले. राज्याला विशेष दर्जा पुन्हा मिळावा, असा ठराव विधानसभेत आवाजी मतदानाने बुधवारी मंजूर झाला. या ठरावाला विरोधकांनी विरोध केला. यादरम्यान भाजपचे आमदार आणि सभागृहात बंदोबस्तासाठी असलेले मार्शल यांच्यात धक्काबुक्की झाली.

justin treudeau s jaushankar canada india
भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली म्हणून कॅनडानं वृत्तसंस्थेलाच केलं ब्लॉक; आगळिकीवर भारताची तीव्र नाराजी!
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
elon musk daughter Vivian Jenna Wilson
Elon Musk Daughter: ‘अमेरिकेत माझे भविष्य कठीण’, ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांच्या तृतीयपंथी मुलीनं व्यक्त केली खंत
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

विधानसभेचे कामकाज गुरुवारी सकाळी सुरू झाल्यानंतर भाजपच्या ठरावाविरोधातील गदारोळाने सभागृह दणाणून गेले. जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळवून देण्याचा ठराव बेकायदा असल्याचे भाजपने म्हटले असून, हा ठराव हटविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केलेला ठराव रद्द करण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगून, सभागृहानेच हा ठराव रद्द केला, तर तो होईल अशी भूमिका घेतली. या गदारोळात पीडीपी आणि ‘पीपल्स कॉन्फरन्स’च्या आमदारांनी नव्या ठरावाची प्रत सादर केली.

हेही वाचा >>>मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बला

यात अनुच्छेद ३७० आणि ३५ अ तत्काळ पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते सुनील शर्मा ठरावावर बोलत असताना अवामी इत्तेहाद पक्षाचे नेते शेख खुर्शीद हौद्यात उतरले. अनुच्छेद ३७० आणि ३५ अ पूर्ववत करण्याचा फलक त्यांनी हातात घेतला होता. भाजपचे आमदार आणि खुर्शीद यांच्यात या वेळी धक्काबुक्की झाली. भाजप आमदारांनी खुर्शीद यांच्या हातातील फलक घेऊन तो फाडून टाकला. विशेष दर्जावरून नॅशनल कॉन्फरन्सचे चाललेले नाटक आम्हाला संपवायचे आहे, असे वक्तव्य शर्मा यांनी केल्यानंतर वातावरण अधिकच चिघळले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली.

Story img Loader