रिओ दि जानेरिओ : ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या राजधानीत ८ जानेवारी रोजी झालेल्या दंगलप्रकरणी व्यापक कारवाईचा एक भाग म्हणून ब्राझीलचे माजी अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांच्या चौकशीस मंजुरी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, न्यायमूर्ती अलेक्झांद्रे डी मोरेस यांनी बोल्सोनारोंच्या विरोधात चौकशीसाठी महान्यायवादी कार्यालयाची विनंती मान्य केली. ही विनंती करताना महान्यायवादी कार्यालयाने दंगलीनंतर दोन दिवसांनी बोल्सोनारो यांनी ‘फेसबुक’वर प्रसृत केलेल्या ध्वनिचित्रफितीचा संदर्भ दिला होता.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप

ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष लुला द सिल्व्हा हे बहुमताद्वारे ब्राझीलचे अध्यक्ष झाले नसून, सर्वोच्च न्यायालय आणि ब्राझीलच्या निवडणूक आयोगाने त्यांची निवड केल्याचा दावा या चित्रफितीत करण्यात आला होता. वकिलांच्या एका नव्या गटाने शुक्रवारी असा युक्तिवाद केला, की बोल्सोनारो यांनी दंगलीनंतर ही चित्रफीत प्रसृत केली गेली होती. त्यातील आशय त्याच्या पूर्वीच्या वर्तनाबाबतचा तपास योग्य ठरवण्यासाठी पुरेशी आहे. बोल्सोनारो यांनी दंगलीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ही चित्रफीत हटवली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, बोल्सोनारोचे वकील फ्रेडरिक वासेफ यांनी एका निवेदनात म्हटले, की, माजी अध्यक्ष बोल्सोनारो यांनी ८ जानेवारी रोजी झालेल्या तोडफोडीचा तीव्र निषेध केला आहे. या निदर्शकांत घुसखोरी करणाऱ्या ‘बाह्य घटकांना’ त्यांनी जबाबदार धरले आहे. आतापर्यंतच्या तपासात बोल्सोनारोंच्या कार्यकाळातील न्यायमंत्री अँडरसन टोरेस यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. टोरेस २ जानेवारी रोजी ‘फेडरल डिस्ट्रिक्ट सिक्युरिटी’चे प्रमुख झाले व दंगलीच्या दिवशी ते अमेरिकेत होते. न्यायमूर्ती डी मोरेस यांनी या आठवडय़ात टोरेस यांच्या अटकेचे आदेश दिले. त्यांच्या कृतीला ‘निष्काळजीपणाचे व संगनमताने केलेले कृत्य’ ठरवून चौकशीचे आदेश दिले. डी मोरेस म्हणाले, की टोरेस यांनी त्याच्या कनिष्ठांना बडतर्फ केले आणि दंगलीपूर्वी देश सोडला. ते मुद्दाम असंतोष निर्मितीस पूरक वातावरणनिर्मिती करत असल्याचे हे संकेत आहेत.

‘..प्रसंगी टोरेस यांच्या प्रत्यार्पणाची विनंती!’

न्यायमंत्री फ्लॅव्हियो डिनो यांनी शुक्रवारी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने माजी सुरक्षा प्रमुख टोरेस यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. त्यांना तीन दिवसांत अमेरिकेहून ब्राझीलमध्ये परतावे लागेल, अन्यथा ब्राझील त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती करेल. टोरेस यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. संस्थागत संपर्क मंत्री अलेक्झांडर पडिल्हा यांनी सांगितले की, सत्तापालटाचा कट सावधपणे पूर्वनियोजनातून आखण्यात आला होता. त्याच्या संबंधितांवर कारवाई केली जाईल. बोल्सोनारोंचे माजी न्यायमंत्री टोरेस यांच्यावर बरेच लक्ष केंद्रित केले आहे.