‘डोली से आएगी बारात’ असं आजवर आपण ऐकलं आणि पाहिलं, पण हैदराबाद येथे वधूने लग्न मंडपात साजश्रृंगार करून चक्क बुलेटवरून एण्ट्री केली. सध्या लग्न सोहळ्याच्या नियोजनात वधूच्या एण्ट्रीला फार महत्त्व दिले जाते. शाही थाट असलेल्या विवाह सोहळ्यात वधू डोली ऐवजी हार-फुलांनी सजवलेल्या ऑटोरिक्षात बसून आल्याचेही आपण पाहिले आहे. पण नुकतेच हैदराबाद येथील आयशा उपाध्याय (२६) हिने आपल्या लग्न सोहळ्यात चक्क बुलेटवरून एण्ट्री घेऊन सर्वांना सरप्राईज दिले.

हैदराबादमध्ये आयशाच्या या हटके स्टाईलची जोरदार चर्चा असून, सोशल मीडियावर आयशाचा व्हिडिओ ‘रिअल बुलेट रानी’ म्हणून व्हायरल होत आहे. आयशा व्यवसायाने शिक्षिका असून, वयाच्या १३ व्या वर्षापासून तिला बुलेट चालवण्याची आवड आहे. मला बुलेट चालवायला खूप आवडते आणि माझ्या लग्नात बुलेटवरून एण्ट्री घेण्याची माझी इच्छा असल्याचे मी आई-वडिलांना सांगितले होते, असे आयशा म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.