मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशातही पूरामुळे लोक हैराण झाले आहेत. मात्र, येथील कोनासीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एक व्हिडिओ समोर आला आहे. पुराने वेढलेल्या भागात बोटीच्या सहाय्याने एका नवरीने आपल्या कुटुंबासह नवदेवाचे घर गाठल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बोटीच्या साहाय्याने नवऱ्या मुलाच्या घरी जाताना

हेही वाचा- “मोदीजी मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही सोडत नाही”;अहमद पटेलांवरील आरोपावरून काँग्रेसची टीका

आंध्र प्रदेशात पुराचा थैमान
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे कोनसीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एका कुटुंबाने जुलैमध्ये आपल्या मुलीचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. परिणामी लोकांना येण्या-जाण्यात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र, पुढच्या महिन्यात पावसाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे जुलै महिन्यातच प्रशांतीचे लग्न करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला. परंतु, पूर परिस्थीतमुळे वाहनांचा वापर करणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर बोटीच्या सहाय्याने प्रशांती आणि कुटुंबीयांनी नवरदेवाचे घर गाठत गाठले आणि दोघांचे लग्न लावण्यात आले.