तेलश्रीमंत ब्रुनेईने इस्लामी गुन्हेगारी कायदा (शरिया)उद्यापासून कडकपणे अमलात आणण्याचे जाहीर केले आहे. ब्रुनेईचे सुलताना हे सर्वात श्रीमंत राज्यकर्ते मानले जात असले तरी त्यांच्या या निर्णयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ते टीकेचे धनी बनले आहेत.
बुधवारी जाहीर केलेल्या राजेशाही फतव्यात त्यांनी म्हटले आहे की, शरिया कायद्याच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी १ मे २०१४ पासून सुरू होत आहे, नंतर हळूहळू इतर टप्पे राबवले जातील. शरिया कायद्यात फटके मारणे, अवयव कापणे, दगडाने ठेचून मारणे यांसारख्या शिक्षा दिल्या जातात.
सर्वत्र तीव्र विरोध
सोशल मीडियावर याबाबत यावर्षांच्या सुरुवातीपासूनच विरोध व्यक्त होत आहे. त्यानंतर शरिया कायद्याची अंमलबजावणी २२ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. ब्रुनेईचे सुलतान या कायद्याच्या अंमलबजावणीवर माघार घेतील, अशी अटकळ होती पण ती खोटी ठरली आहे. सुल्तान हसनल बोलकिया यांनी सांगितले की, हा फतवा इस्लामनुसार काढण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार असा एक सिद्धांतच आहे की, अल्लाहचे कायदे क्रूर व अन्याय्य आहेत पण अल्लाह यांनीच ते न्याय्य असल्याचे म्हटले आहे.
बोलकिया यांची प्रचंड मालमत्ता
ब्रुनेईचे राजे असलेल्या बोलकिया यांची मालमत्ता फोर्बस नियतकालिकानुसार २० अब्ज अमेरिकी डॉलर असून त्यांच्याकडे महागडी वाहने, राजवाडे व दागिने आहेत. हसनल व त्यांचे बंधू जेफ्री बोलकिया यांच्यात जेफ्री १९९० मध्ये अर्थमंत्री असतानाच्या १५ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या गैरव्यवहारावरून वाद होते. न्यायालयीन लढाईत जेफ्री यांची इस्लामिकतेला बाधा आणणारी जेट-सेट जीवनशैली उघड झाली होती. ते पाश्चिमात्य मैत्रिणींना किमती दागिने देत असत व त्यांच्यासमवेत नौकानयन करून विलासी जीवन जगत होते. ब्रुनेनियन लोकांचे जीवनमान आशियात सर्वात उच्च दर्जाचे असून तेथे शिक्षण, वैद्यक व सामाजिक सेवा या अनुदानित आहेत. सुलतानांनी १९९० मध्ये प्रथम शरियत कायदा प्रस्तावित केला.
इस्लाम म्हणजे जागतिकीकरणाविरोधातील फायलवॉल आहे असे त्यांनी इंटरनेटमुळे होणाऱ्या परिणामांवर म्हटले होते. त्यामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्येच शरिया कायदा लागू करण्याचे ठरवले होते, ब्रुनेई हा पूर्व व आग्नेय आशियातील असा पहिला देश आहे जो राष्ट्रीय पातळीवर शरिया दंडसंहिता लागू करीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2014 रोजी प्रकाशित
ब्रुनेईत आजपासून कडक शरिया कायदा लागू
तेलश्रीमंत ब्रुनेईने इस्लामी गुन्हेगारी कायदा (शरिया)उद्यापासून कडकपणे अमलात आणण्याचे जाहीर केले आहे. ब्रुनेईचे सुलताना हे सर्वात श्रीमंत राज्यकर्ते मानले जात असले तरी त्यांच्या या निर्णयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ते टीकेचे धनी बनले आहेत.

First published on: 01-05-2014 at 12:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brunei introduces tough sharia law