बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या पक्षाला गत लोकसभा निवडणुकांमध्ये अपयश मिळाल्यानंतर आता त्यांनी पक्षाची पुर्नबांधणी करण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये रविवारी पार पडलेल्या बसपाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मायावती यांनी पक्षातील फेरबदल घोषित केले.  त्यांनी  दानिश अली यांना लोकसभेतील बसपाचे नेते म्हणुन घोषित केले. भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तर पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसपात आता राष्ट्रीय स्तरावर दोन समन्वयक बनवण्यात आले आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्य़ा गौतम यांच्याकडेही राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बसपाच्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या महत्त्वपूर्ण बैठीकीस आलेल्यांचे बैठक कक्षात जाण्याअगोदर मोबाइल, बॅग, वाहनाची किल्ली एवढेच नाहीतर पेन देखील जमा करून घेण्यात आले होते. बैठकीस पक्षाच्या खासदारांबरोबर अनेक प्रभारी देखील उपस्थित होते.

लोकसभेतील बसपाचे नेते म्हणुन नियुक्त करण्यात आलेले दानिश अली हे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी व माजी पंतप्रधान देवगौडा यांच्या जवळचे म्हणुन ओळखले जाते. लोकसभा निडणुकां अगोदर देवगौडा यांच्या मदतीनेच दानिश अली हे बसपात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp leader danish ali was the leader of the lok sabha msr87
First published on: 23-06-2019 at 17:39 IST