दिल्लीत लाजपथनगर परिसरात अज्ञात टोळक्याने एका व्यापाराचे तब्बल सहा कोटी रूपये भर दिवसा सापळा रचून नाट्यमयरित्या लुटले. सदर घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
दिल्लीतील हा व्यापारी आपल्या होंडा सिटी कारमधून सहा कोटींची रोकड बँकेत जमा करण्यासाठी घेऊन जात होता. त्यावेळी चोरट्यांनी व्यापाऱयाच्या कारला मागून मुद्दाम धडक दिली. तसेच पुढे जाऊन या व्यापाऱयाची कार थांबविली आणि त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.
भांडणाच्या कारणाने त्याला गुंतवून ठेवले इतक्यात चार चोरांची आणखी एक टोळी मागून आली आणि व्यापाऱ्याची होंडा सिटी कार घेऊन ही टोळी फरार झाली.
व्यापाऱयाशी हुज्जत घालत असलेल्यांनीही तेथून पळ ठोकला आणि पुढे जाऊन कारमधून तेही फरार झाले. दरम्यान, चोरट्यांनी आपली कार जागीच सोडली होती. व्यापाऱयाने पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी चोरट्यांची कार ताब्यात घेतली आहे आणि पुढील चौकशीला सुरूवात केली आहे. या होंडा सिटी कारमध्ये सहा कोटी रोकड असल्याची माहिती व्यापाऱयाने दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
भरदिवसा चोरट्यांनी नाट्यमयरित्या लुटले सहा कोटी!
दिल्लीत लाजपथनगर परिसरात अज्ञात टोळक्याने एका व्यापाराचे तब्बल सहा कोटी रूपये भर दिवसा सापळा रचून नाट्यमयरित्या लुटले. सदर घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

First published on: 28-01-2014 at 03:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman robbed of rs six crore in lajpat nagar