Suhel Seth On Gurugram : हरियाणातील गुरूग्राम हे शहर गेल्या काही दिवसांपासून येथील ढासळलेल्या नागरि सुविधांच्या खराब स्थितीमुळे चर्चेत आले आहे. शहरातील अस्वच्छता आणि गैर-व्यवस्थापनावर टीका होत असताना आता उद्योजक आणि स्तंभलेखक सुहेल सेठ यांनी देखील गुरूग्रामच्या नागरी प्रशासन व्यवस्थेवर आणि पायाभूत सुविधांच्या अपुरेपणावर टीका केली आहे. दिल्लीत द इंडियन एक्सप्रेसने आय़ोजित केलेल्या एका चर्चेत बोलताना सेठ यांनी हे शहर या देशासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्लीपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असूनही हे शहर कशा प्रकारे प्रशासकीय अपयशाचे धक्कादायक उदाहरण बनले आहे यावर देखील त्यांनी भाष्य केले.

“दरवर्षी, सरकारच्या मदतीशीवाय आम्ही लोकांना आनंद घेता येवा यासाठी व्हेनिस तयार करतो. गुरूग्रामची समानतेची भावना दाखवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर कचरा फेकतो,” अशा शब्दात सेठ यांनी उपहासात्मक टीका केली. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, “आमच्याकडे चालू असलेल्या ट्रॅफिक लाईट्सपेक्षा जास्त दारूची दुकाने आहेत. आमच्याकडे शाळांपेक्षा जास्त बार आहेत.”

गुरुग्रामच्या स्थितीबाबत व्यक्त केला रोष

सेठ यांनी शहराच्या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, “मुलभूत प्रशासनासाठी शहराला ‘नॉन-हॉस्टाइल टेकओव्हर’ची गरज आहे. “अनस्मार्ट नेते असताना स्मार्ट शहरे असू शकत नाही. तुमच्याडके पूर्णपणे अकुशल मुख्यमंत्री आहेत. तुमच्याकडे एक नगरपालिका आयुक्त आहे जो पूर्णपणे गायब आहेत.”

सरकारकडून प्रतिसाद

सेठ यांनी एक्सवर पोस्ट करत प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून दोन फोन आल्याचे म्हटले आहेत तसेच लवकरच बदल बाहायला मिळतील असेही सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांना @RajeevJaitly आणि @PradeepIAS_HR या दोघांकडून फोन करण्यात आला आणि त्यांनी शांगितले की हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी गुरूग्राम संबंधीत प्रश्नांची दखल घेतली आहे,आणि कारवाई सुरू झाली आहे आणि लवकरच बदल दिसून येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुग्राममध्ये ८ जणांचा मृत्यू

यादरम्यान जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने गुरुग्रामच्या नागरी मुलभूत सुविधांचा अपुरेपणा आणि त्याकडे होणारं दुर्लक्ष उघडे पाडले आहे. या पावसामुळे किमान ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू पाऊसाशी संबंधित घटना, वीजेचा शॉक लागणे, रस्ते अपघात यामुळे झाले आहेत. पावसाचा जोर वाढल्यानंतर शहरात सर्वत्र पाणी साचल्याचे, गटारे तुंबल्याचे आणि वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले, यामुळे सर्व स्तरातून प्रशासनावर टीका करण्यात आली.