भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी स्वत:मध्ये बदल केल्यानंतरच मी त्यांना मत देईन, असे मुस्लिम धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी म्हटले आहे.
मोदींची रामाला बगल
सादिक म्हणाले, गुजरातमधील जातीय दंगलीनंतर नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी स्वत:मध्ये बदल घडविला पाहिजे. तसेच मोदींनी केलेली कामे आणि ते जे सांगत आहेत, त्यामध्ये भरपूर तफावत आहे. असेही सादिक म्हणाले. मौलाना सादिक हे ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे उपाध्यक्ष देखील आहेत. एका कार्य़क्रमाच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत बोलत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविषयी त्यांना विचारले असता सादिक म्हणाले,”अखिलेशजवळ अनुभवाची कमतरता आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी पक्षाची धुरा सांभाळण्याची आता वेळ आली आहे.”
भाजप नेत्यांसाठी मोदीच ‘स्टार’; प्रचारासाठी ‘सेलिब्रिटी’ नकोत!