आता निवडणूक लढण्यापूर्वी उमेदवाराला नामांकन अर्ज भरताना आपल्या पत्नीच्या उत्पन्नाचा स्त्रोतही सांगावा लागणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. सरकारने निवडणूक आचारसंहितेमध्ये सुधारणा करत प्रतिज्ञापत्रात एका नव्या रकान्याचा समावेश केला आहे. यामध्ये उमेदवाराला आपला आणि आपल्या पत्नीच्या उत्पन्नाचा स्त्रोत द्यावा लागणार आहे. गतवर्षी योजना आयोगाने यासंबंधी कायदा मंत्रालयाशी संपर्कही साधला होता. यामुळे निवडणूक प्रक्रियेत आणखी पारदर्शकता येईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. यासंबंधी काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. सुलभ लोकशाहीसाठी हे केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामुळे मतदाराला उमेदवार आणि त्याच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत महिती होतील. नवा नियम गत महिन्यातील दि. ७ एप्रिल रोजी कायदा मंत्रालयाने अधिसूचित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते की, एका उमेदवाराने नामांकन अर्ज भरताना आपले व आपल्या परिवाराच्या उत्पन्न त्रोताची माहिती दिली नव्हती. पण अर्ज क्रमांक २६ मध्ये त्याला आपलं व पत्नीचे आणि कुटुंबीयांच्या उत्पन्नाची माहिती देणे गरजेचे होते. पण त्याने तीही माहिती दिली नव्हती. भारतात कोठूनही निवडणूक लढवता येते. आता नव्या रकान्यात उमेदवाराला आपण भारतीय आहोत, किंवा नाही याचीही माहिती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर त्याला हेही सांगावे लागेल की त्याच्याकडे एखादे लाभाचे पद आहे किंवा नाही. तो एखाद्या सरकारी कंपनीत व्यवस्थापक आहे किंवा नाही, हे सांगावे लागेल. त्याला हेही सांगावे लागेल की केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत असताना भ्रष्ट्राचार किंवा इतर कारणासाठी निलंबित करण्यात आलेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates to declare spouse source of income says election commission
First published on: 27-05-2017 at 14:59 IST