नवी दिल्ली : कोट्यवधी गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी लोकसभेत केली.

शून्य प्रहराला गरजेच्या वस्तूंची भाववाढ आणि महागाई या विषयावरील चर्चेमध्ये सुळे यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. खाद्यतेलाचे भावही गगनाला भिडले असून सर्वसामान्यांना ते परवडेनासे झाले आहे, असे सुळे यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली असून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसवरील कर कमी करावे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे सुळे यांनी सांगितले.