चंदिगढ येथे डिस्कोथेकमधील मुलींच्या पहेरावर कडक निर्बंध लादण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे. कोणत्याही डिस्कोथेकमध्ये स्त्रियांनी तोकडे कपडे घालून जाण्यास चंदीगढ प्रशासनातर्फे पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्त्रियांनी डिस्कोथेकमध्ये तोकडे कपडे परिधान करून जाणे अथवा गैरवर्तन करणे आता खपवून घेतले जाणार नसल्याचे प्रशासनाने ठरवले आहे. ‘कंट्रोलिंग ऑफ प्लेसेस ऑफ पब्लिक अॅम्यूजमेंट २०१६’ च्या धोरणांतर्गत डिस्कोथेकमधील स्त्रियांच्या कपडे परिधान करण्यावर प्रशासनाने काही नियम घातले आहेत. १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या या धोरणात डिस्कोथेकच्या वेळेतदेखील मर्यादा घालण्यात आल्या आहेत. रात्री २ वाजेपर्यंत चालणारे डिस्कोथेक आता रात्री १२ वाजेपर्यंतच उघडे राहू शकतात.
अनेक तरुणांनी या नियमांबाबत नाराजी जाहीर केली असली तरी चंदिगढ प्रशासन याची कडक अंमलबजावणी करणार आहे. डिस्कोथकमधील स्वैराचारामुळे अशा ठिकाणी समाजातील विघातक शक्तींना खतपाणी मिळत असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2016 रोजी प्रकाशित
डिस्कोथेकमधील मुलींच्या तोकड्या कपड्यांवर चंदीगढमध्ये बंदी
चंदिगढ येथे डिस्कोथेकमधील मुलींच्या पहेरावर कडक निर्बंध लादण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-04-2016 at 15:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandigarh all set to ban scantily dressed women from discotheques