तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली.
तेलंगणाला विशेष दर्जा द्यावा या मागणीचे समर्थन करण्यासाठी तेलंगणच्या मागासलेपणाचा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला, असे तेलंगण राष्ट्र समितीचे नेते बी. विनोदकुमार यांनी वार्ताहरांना सांगितले.
तेलंगणमधील दहापैकी आठ जिल्हे मागासलेले असल्याचे नियोजन आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळेच तेलंगणला विशेष राज्याच्या दर्जा देणे महत्त्वाचे आहे, असेही विनोदकुमार म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2014 रोजी प्रकाशित
तेलंगणला विशेष दर्जा द्यावा – चंद्रशेखर राव
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली.

First published on: 12-10-2014 at 02:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandra sekhar rao demands special status for telangana