scorecardresearch

फक्त सात तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर सर्जरी; राज्य सरकारकडून डॉक्टरच्या चौकशीचे आदेश

सरकारी नियमांनुसार सर्जन एका दिवसात ३० सर्जरीच करु शकतो

फक्त सात तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर सर्जरी; राज्य सरकारकडून डॉक्टरच्या चौकशीचे आदेश
सरकारी नियमांनुसार सर्जन एका दिवसात ३० सर्जरीच करु शकतो (प्रातिनिधिक फोटो)

फक्त सात तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर सर्जरी करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर झालेल्या गदारोळानंतर अखेर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. छत्तीसगडमध्ये एका सरकारी नसबंदी शिबिरात हा प्रकार घडला आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरगुजा जिल्ह्यात एका सर्जनने सात तासात १०१ महिलांवर सर्जरी केली.

२७ ऑगस्ट रोजी हे शिबीर पार पडलं. स्थानिक वृत्तपत्रांनी या शिबिरामध्ये अनागोंदी कारभार सुरु असल्याचं वृत्त दिलं होतं. यानंतर आरोग्य विभागाने याची दखल घेत सर्जन आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान तक्रारींची दखल घेत तपास सुरु करण्यात आला आहे. तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण योजनेचे मुख्य सचिव डॉक्टर अशोक शुक्ला यांनी दिली आहे.

“सरकारी सर्जनने एकूण १०१ सर्जरी केल्या आहेत. ज्या महिलांवर सर्जरी करण्यात आली त्यांची स्थिती सध्या सामान्य असल्याचं सांगितलं जात आहे. पण सरकारी नियमांनुसार, सर्जन दिवसात ३० सर्जरीच करु शकतात. नियमांचं पालन का केलं नाही याची माहिती घेण्यासाठी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे,” अशी माहिती डॉक्टर शुक्ला यांनी दिली आहे.

दरम्यान सर्जनने मोठ्या प्रमाणात महिला आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला सर्जरीसाठी विनंती केली असल्याचं म्हटलं आहे. या महिला गावांमधून आलेल्या होत्या आणि त्यांना वारंवार प्रवास करणं शक्य नव्हतं असंही त्याने म्हटलं आहे.

चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. “२७ ऑगस्टला १२ ते ७ दरम्यान या सर्जरी करण्यात आल्या. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर कारवाई केली आहे. जर कोणी दोषी आढळलं तर कठोर कारवाई केली जाईल,” अशी माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhattisgarh orders probe after surgeon operates on 101 women in 7 hours sgy

ताज्या बातम्या