भविष्यातील संभाव्य हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी चीन चाचपणी करीत असून यासाठी त्यांनी राजधानी बीजिंगमध्ये हवाई हल्ल्यांच्या वेळी करण्यात येणाऱ्या कारवाईचे प्रात्यक्षिक घेण्याचे ठरविले आहे.
हे प्रात्यक्षिक १९ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून अतिदक्षतेसाठी वाजविण्यात येणारा भोंगा उपनगरातील तोंगझू, फांगशान, डॅक्सिंग या जिल्ह्य़ांमध्येही एकू येणार आहे, अशी माहिती बीजिंग लष्कराकडून देण्यात आली.
या उपक्रमाची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. या प्रात्यक्षिकांमध्ये निवारा, संरक्षण, स्थलांतर यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मेंटागू, फांगशान आणि यांकिंग या जिल्ह्य़ांमध्ये अशी कारवाई करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2015 रोजी प्रकाशित
हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चीनची चाचपणी
या उपक्रमाची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे.
Written by रत्नाकर पवार
First published on: 14-09-2015 at 03:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China air strike test