अण्वस्त्रप्रसार विरोधी करारावर (नॉन- प्रोलिफरेशन ट्रीटी ) स्वाक्षरी करणे हा विस्तारीकरणाच ‘महत्त्वाचा’ भाग असल्याचे ४८ देशांच्या गटातील बहुतेक सदस्यांचे मत होते, असे सांगून अणुपुरवठादार गटात (एनएसजी) भारताचा प्रवेश रोखण्याच्या आपल्या कृतीचे चीनने शुक्रवारी समर्थन केले.
संबंधितांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी अण्वस्त्रप्रसार विरोधी करार (न्यूक्लिअर नॉन- प्रोलिफरेशन ट्रीटी – एनपीटी) केवळ चीनच नव्हे, तर एनएसजीच्या अनेक सदस्यांचे मत होते, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले.पाकिस्तानचा एनएसजीमध्ये प्रवेश व्हावा यासाठी चीन जोमाने प्रयत्न करत असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता लु म्हणाले, की एनएसजी हा एनपीटीचा महत्त्वाचा भाग असून, आंतरराष्ट्रीय समुदायाचे त्याबाबत बऱ्याच काळापासून सहमत आहे. भारत हा एनएसजीचा भाग नसला, तरी या सहमतीला भारतही मान्यता देतो, असा दावा त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2016 रोजी प्रकाशित
अणुपुरवठादार गटात भारताचा प्रवेश रोखण्याचे चीनकडून समर्थन
अणुपुरवठादार गटात (एनएसजी) भारताचा प्रवेश रोखण्याच्या आपल्या कृतीचे चीनने शुक्रवारी समर्थन केले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 14-05-2016 at 00:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China claims support of several nsg members to block indias bid