भारतात पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर शस्त्रास्त्रांची तस्करी करता यावी, यासाठी पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी संघटना आणि आयएसआयने मोठया ड्रोन्सचा वापर सुरु केला आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या लोकांनी ही माहिती दिली. गेली काही वर्ष आयएसआय आणि दहशतवादी संघटना शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी छोटया क्षमतेच्या ड्रोन्सचा वापर करत होते. पण आता मोठया प्रमाणात शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी त्यांनी अपग्रेडेड नवीन ड्रोन्स खरेदी केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. एलओसीवरील डोंगररांगावर बर्फ साचल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना सहजासहजी घुसखोरी करता येत नाही. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ड्रोन्सच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे टाकतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी सीमेपलीकडून ही शस्त्रास्त्रे पाठवली जातात, वेगवेगळया इंटेलिजन्स रिपोर्टमधून हे समोर आले आहे.

पंजाबमध्ये दहशतवाद पूनर्जीवित करण्यासाठी तिथल्या शेतकरी आंदोलनात पाकिस्तानातील खलिस्तानी गटांनी शिरकाव केल्याचे रिपोर्टस आहेत. राज्य पोलिसांकडून या धोक्याबद्दल केंद्र सरकार आणि सुरक्ष यंत्रणांना सर्तक करण्यात आले आहे. शस्त्रास्त्र पोहोचवण्यासाठी चिनी ड्रोन्सच वापर ही समस्येची एकबाजू आहे. पण वजन वाहून नेण्यासाठी सक्षम असलेल्या ड्रोन्सचा सीमेजवळ बॉम्बफेकीसाठी सुद्धा वापर होऊ शकतो, याबद्दल गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना सतर्क केले आहे.

स्वस्तातले ड्रोन वापरुन बॉम्ब हल्ला करता येतो, त्यामुळे आयएसआय दहशतवादी संघटनांना अशा मार्गाने हल्ले करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. आयएसआयने यावर्षी एप्रिल महिन्यात सर्वप्रथम लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर्स बरोबर झालेल्या बैठकीत या रणनितीवर चर्चा केली होती. त्यानंतर महिन्याभरानंतर पीओकेमधील कोटली जिल्ह्यातील मुख्यालयात याबद्दल चर्चा झाली. इंटेलिजन्स एजन्सीने ही माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China made drones are the new weapon in pakistans jihadi arsenal dmp
First published on: 01-12-2020 at 15:40 IST